

खारघरमध्ये शालेय बसचालकाकडून नियमांचे उल्लंघन
विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका, कारवाईची मागणी
खारघर, ता. २३ (बातमीदार) : परिसरातील मुख्य चौकात एका शालेय बसचालकाकडून वाहतूक सिग्नलचे उघडपणे उल्लंघन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून, या चालकाविरोधात नागरिकांनी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शालेय बसचालकाने लाल सिग्नल असतानाही वाहन पुढे नेल्याचे दिसून आले. चौकात इतर वाहने तसेच दुचाकीस्वारांची वर्दळ असताना हा प्रकार घडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. शालेय बसमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याने चालकाने अधिक जबाबदारीने वाहन चालवणे अपेक्षित असताना नियमांचे उल्लंघन झाल्याने पालक आणि नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. खारघर वाहतूक शाखा आणि संबंधित प्रशासनाकडे या घटनेची दखल घेऊन संबंधित बसचालकावर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.