

नवी मुंबईत अखेर पावसाची हजेरी
०५.०८ मिमी पावसाची नोंद
वाशी, ता. २३ (बातमीदार) ः गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेल्या नवी मुंबईकरांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईसह पनवेल आणि उरण तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. गेल्या २४ तासांत नवी मुंबई शहरात सरासरी ०५.०८ मिमी पावसाची नोंद झाली असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खालापूर येथील मोरबे धरण क्षेत्रातही पाऊस सक्रिय झाल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात नवी मुंबई पालिकेच्या मालकीचे मोरबे धरण आहे. या धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाण्याचा साठा शिल्लक असल्यामुळे पाणीकपातीचा निर्णय पालिकेने जाहीर केला होता. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसव्या लागत होत्या. परंतु, सोमवार (ता. २२)पासून रायगड जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, धरण क्षेत्रातही चांगली कामगिरी दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत नवी मुंबईत सरासरी ०५.०८ मिमी पाऊस झाला, तर मोरबे धरण क्षेत्रात १९.२० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मोरबे धरणाची पाणीपातळी ही ६९.४८ मीटर (२६.४० %) एवढी आहे.
विभागवार पावसाची आकडेवारी
बेलापूर ९.१० मिमी
नेरूळ ६.६० मिमी
वाशी २.६० मिमी
कोपरखूरणे ८.४० मिमी
ऐरोली २.०० मिमी
दिघा २.८० मिमी
सरासरी - ५.८ मिमी
आतापर्यंत १ जूनपासून झालेला पाऊस ९.८५ मिमी
मोरबे धरण
एकूण पाऊस १९.२० मिमी
एकूण पाऊस १ जून ते आतापर्यंत २५.२० मिमी
पातळी ६९.४८ मी (२६.४० टक्के)
शहरात आगीच्या घटना; झाड कोसळले
पावसाच्या आगमनासोबतच शहरात काही आपत्कालीन घटनांचीही नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या, तर एका ठिकाणी मोठे झाड कोसळल्याची दुर्घटना घडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.