मालवणीतील पालिका शाळा जलमय!

मालवणीतील पालिका शाळा जलमय!
Published on

मालवणीतील पालिका शाळा जलमय!
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
मालाड, ता. २३ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मालवणी गेट क्रमांक ७ येथील मुंबई महापालिकेच्या एमएचबी-१ आणि एमएचबी-३ शाळांच्या परिसरात मंगळवारी सकाळी झालेल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. हिंदी माध्यमाच्या या शाळांमध्ये सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक पालकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी साचण्याची समस्या कायम आहे. पाऊस नसतानाही लगतच्या गटारातील सांडपाणी शाळेच्या आवारात साचत असल्याची तक्रार त्यांनी केली. शाळेची पातळी रस्त्यापेक्षा खालच्या स्तरावर असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.
जोरदार पाऊस झाल्यानंतर वर्गखोल्यांमध्येही पाणी शिरत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना पाण्यात बसून शिक्षण व अध्यापन करावे लागत असल्याचे पालकांनी सांगितले. पावसाच्या पाण्यात गटारातील घाण पाणी मिसळल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पालक रंजना तिवारी यांनी महापालिकेने शाळेची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. स्थानिक नागरिक आणि पालकांनीही प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com