

मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) ः मुंबईतील वडाळा पोलिस ठाण्यात कार्यरत एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून त्याच्या ३४ वर्षीय पत्नीने आत्महत्या केल्याची घटना रबाळे येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणाची दखल घेत रबाळे पोलिस ठाण्यात संबंधित पोलिस कर्मचाऱ्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अनिता डोळस रबाळे गावात गणेश कृपा अपार्टमेंटमध्ये पोलिस कर्मचारी व पती अरुण डोळस याच्यासह दोन मुलांसोबत राहत होती. अनिताने वकिलीचे शिक्षण घेतले होते. तसेच ती ठाणे येथील न्यायलयात प्रॅक्टीसदेखील करत होती. अरुण डोळस याचे गावाकडील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यावरुन २०२३ पासून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. यातून अरुण हा पत्नी अनिताला सतत मानसिक त्रास देत होता. दरम्यान, याप्रकरणी अनिताचे वडील मधुकर सुतार यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आत्महत्येस प्रवृत्त
अरुणने अनिताचा गर्भपात करण्यासाठी तिला रुग्णालयात नेले होते. डॉक्टरांनी गर्भपाताच्या गोळ्या दिल्यामुळे तिला खूप त्रास होत असतानाही अरुण गावी निघून गेला होता. १२ जून रोजी अरुणने प्रेयसीसोबतचा अश्लील व्हिडिओ दाखवला. त्यामुळे संतप्त झालेल्या अनिताने अरुणला व्हिडिओ कॉल करून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेजारीच राहणाऱ्या अनिताच्या आई-वडिलांनी वेळीच धाव घेऊन तिला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तीन दिवसांच्या उपचारानंतर तिचा रुग्णालयात मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.