रायगडात मुसळधार!

रायगडात मुसळधार!
Published on

रायगडात मुसळधार!
अनेक तालुक्यांत पावसाची शंभरी पार
अलिबाग, ता, २४ (वार्ताहर) ः जिल्ह्यात रविवारी (ता. २४) रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. प्रत्येक तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसह बळीराजानेही सुटकेचा श्वास सोडला आहे. जिल्ह्यात बुधवारी (ता. २४) सकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण १,९०६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी पहिल्याच पावसात अपूर्ण व खड्डेमय रस्ते, रस्त्यांवर साचलेले पाणी, निसरड्या रस्त्यांमुळे होणारे अपघात आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची संततधार कायम असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. मंगळवारी (ता. २४) संध्याकाळपासून पावसाचा जोर अधिक वाढला असून, नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कोरडे झालेले ओढे आणि नाले पुन्हा खळाळून वाहू लागले आहेत.

किल्ले रायगडावरील पायरी मार्गावर दरड
महाड तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे किल्ले रायगडच्या पायरी मार्गावर महादरवाजा ते मदार मोर्चादरम्यान दगड खाली आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असल्याची माहिती महाड तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

कशेडी घाटातही मातीचा ढिगारा रस्त्यावर
कशेडी घाटात चोळई गावानजीक मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना कशेडी घाटातील डोंगराचा भाग कापल्यामुळे चोळई हद्दीत दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भोगाव हद्दीतील जुन्या महामार्गावर खचलेल्या रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठमोठे दगड रस्त्यावर आले असून, या ठिकाणी दरड कोसळण्याची टांगती तलवार कायम आहे.

नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
सोमवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे कोरड्या पडलेल्या नद्यांची पात्रे पुन्हा वाहू लागली आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या सावित्री नदी २.६० मी., अंबा नदी ६.३० मी., कुंडलिका नदी २२.६० मी., पाताळगंगा नदी १६.८० मी., उल्हास नदी ४२.३५ मी., गाढी नदी १.३० मी. एवढी झाली आहे.

तालुकानिहाय पावसाची नोंद
अलिबाग १२८ मिमी., मुरूड ८५ मिमी., पेण १६० मिमी., पनवेल १४७.०२ मिमी, उरण १३५ मिमी., कर्जत ८९ मिमी., माथेरान ९७ मिमी., खालापूर ९३ मिमी., रोहा ५९ मिमी., सुधागड १४४ मिमी., माणगाव १०० मिमी., तळा १७४ मिमी., महाड ९८ मिमी., पोलादपूर १२९ मिमी., श्रीवर्धन ९५ मिमी., म्हसळा १७३ मिमी. एकूण - १,९०६.२ मिमी.

तालुका पाऊस (मिमी)
तळा १७४ मिमी.
म्हसळा १७३ मिमी.
पेण १६० मिमी.
पनवेल १४७.०२ मिमी.
सुधागड १४४ मिमी.
उरण १३५ मिमी.
पोलादपूर १२९ मिमी.
अलिबाग १२८ मिमी.
माणगाव १०० मिमी.
महाड ९८ मिमी.
माथेरान ९७ मिमी.
श्रीवर्धन ९५ मिमी.
खालापूर ९३ मिमी.
कर्जत ८९ मिमी.
मुरूड ८५ मिमी.
रोहा ५९ मिमी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com