

रोह्यात गॅस एजन्सीकडून ग्राहकांची गैरसोय
भरपावसात आणि चिखलात होतेय सिलिंडर वितरण
रोहा, ता. २४ (बातमीदार) ः शहरासह परिसरातील अनेक गावांमधून भारत गॅस एजन्सीच्या सेवेसाठी येणाऱ्या ग्राहकांना पावसाळ्यात मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. एजन्सीकडून बायपास रोडवर सिलिंडरचे वितरण केले जाते. मात्र, या ठिकाणी प्रचंड चिखल, अस्वच्छता आणि शेडची कोणतीही व्यवस्था नसल्याने ग्राहकांची परवड होत आहे. या कारभारामुळे भारत गॅस सिलिंडर एजन्सीबद्दल ग्राहक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गॅस सिलेंडर घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना चिखलातून वाट काढत रांगेत उभे राहावे लागत आहे. आधीच बाजारपेठेच्या मागील बाजूस घाणीचे साम्राज्य पसरलेले असून, दुर्गंधीयुक्त वातावरणात तासन्तास नाकावर रुमाल बांधून प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार ग्राहकवर्गातून होत आहे. विशेष म्हणजे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. ग्राहकांसाठी स्वच्छ परिसर, चिखलमुक्त मार्ग, बसण्याची व्यवस्था आणि पावसापासून संरक्षणासाठी निवारा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.
एजन्सीला निर्देश देणार
तालुका पुरवठा अधिकारी हेमलता कुरसुगे यांनी या प्रकरणाची दखल घेत संबधित एजन्सीला ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. परिसरात स्वच्छता राखणे व निवारा शेड उभारणे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत एजन्सीला निर्देश दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारीचा इशारा
गॅस ही प्रत्येक कुटुंबाच्या जीवनाशी निगडित अत्यावश्यक सेवा आहे. अशा सेवेकरिता ग्राहकांना चिखल, अस्वच्छता आणि पावसात रांगेत उभे राहावे लागणे अत्यंत दुर्दैवी असून, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारी गैरसोय गंभीर बाब आहे. एजन्सीकडून ग्राहकांच्या सर्व गैरसोयी दूर करून द्यावेत अन्यथा संबधित एजन्सीविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली जाईल, असा इशारा शेकापचे जिल्हा चिटणीस विठ्ठल मोरे यांनी दिला आहे..
फोटो कॅप्शन :
रोहा ः गॅस सिलिंडर वितरणसाठी आलेल्या ग्राहकांची गैरसोय होताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.