

करंजाडे ग्रामपंचायतीकडून ४० दिव्यांगांना निर्वाह भत्तावाटप
उलवे, ता. २४ (बातमीदार) : करंजाडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना आर्थिक सहाय्य स्वरूपातील निर्वाह भत्तावाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत परिसरातील ४० दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले.
अपंगत्वामुळे नियमित रोजगार किंवा व्यवसाय करणे अनेकांसाठी शक्य नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनतो. ही बाब लक्षात घेऊन दिव्यांगांच्या दैनंदिन गरजांना हातभार लागावा आणि त्यांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविला.
कार्यक्रमात शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच दिव्यांग बांधवांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. समाजाच्या मुख्य प्रवाहात दिव्यांगांचा सहभाग वाढविण्यासाठी अशा योजनांचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
या वेळी लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. कार्यक्रमाला करंजाडे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांच्यासह ग्रामस्थ, मान्यवर आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.