ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. आशीष शेलार

ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. आशीष शेलार
Published on

ई-स्पोर्ट्‌स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. आशीष शेलार

मुंबई, ता. २८ : ‘ई-स्पोर्ट्‌स गेम्स फेडरेशन’च्या अध्यक्षपदाची धुरा इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकासमंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी स्वीकारली. देशातील २२ राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या फेडरेशनच्या सर्वसाधारण बैठकीत ॲड. शेलार यांची निवड करण्यात आली.
ॲड. शेलार म्हणाले, की ‘ई-स्पोर्ट्‌स क्षेत्राला अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि व्यावसायिक स्वरूप मिळावे, त्यातून आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होऊ शकेल व आपल्या देशात रोजगार उपलब्ध होऊ शकेल. युवा पिढीतील डिजिटल कौशल्यांना व्यासपीठ देतानाच ई-स्पोर्ट्‌सला केवळ मनोरंजन किंवा गेमिंग न मानता कौशल्य, शिस्त, प्रशिक्षण आणि करिअरची संधी असलेले क्षेत्र म्हणून विकसित करण्याचे आव्हान स्विकारून तरुणांसाठी काम करू, मैदानी खेळाप्रमाणे ई-स्पोर्ट्‌समध्येही प्रावीण्य असलेले खेळाडू तयार करू, त्यासाठी विविध राज्यांच्या फेडरेशनशी समन्वय साधून केंद्र सरकारशी आवश्यक तो संवाद साधणार आहोत.’ ही फेडरेशन आपल्या देशातील ई-स्पोर्ट्‌सच्या विकासासाठी कार्यरत महत्त्वाची संस्था असून या क्षेत्रात झपाट्याने होणारी वाढ पाहता यातील नव्या संधी तरुणांना उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. भारतात सुमारे ५२ कोटी गेमर्स असून दिवसाला ११ कोटी खेळाडू खेळतात, आपल्या देशात २८ या खेळांच्या टूर्नामेंट होतात. हे गेम पाहणाऱ्यांची संख्या सुमारे आठ ते नऊ कोटी एवढी आहे. पारंपरिक क्रिकेट, फुटबॉल किंवा हॉकीमध्ये जसे राष्ट्रीय संघ, निवड प्रक्रिया, स्पर्धा, प्रशिक्षण, नियम आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्वाची व्यवस्था असते, त्याच धर्तीवर ई-स्पोर्ट्‌समध्येही एक संरचित व्यवस्था उभारण्याचे काम हे फेडरेशन करते.

क्रिकेट, फुटबॉल, दोरीउड्या, दहीहंडी साहसी खेळ अशा विविध मैदानी खेळांच्या फेडरेशन व संघटनांवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या ॲड. आशीष शेलार यांच्या नियुक्तीमुळे या क्षेत्राला नवी चालना मिळेल, असा आशावाद फेडरेशनने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com