

कल्याणमध्ये टँकरच्या धडकेत पाच जखमी
मद्यधुंद चालकाचा धुमाकूळ; दोन रिक्षांसह सात-आठ दुचाकींना धडक
कल्याण, ता. २९ (वार्ताहर) : रामबाग स्टेशन रोड परिसरात शुक्रवारी मद्यधुंद असलेल्या पाण्याच्या टँकरचालकाने भरधाव वाहन चालवत धुमाकूळ घातला. टँकरने दोन रिक्षांसह सात ते आठ दुचाकींना धडक दिली. यात पाच जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनी कुमार गुल्लू असे टँकरचालकाचे नाव आहे. तो कथितरीत्या मद्यधुंद अवस्थेत पाण्याचा टँकर चालवत होता. रामबाग क्र. ३, डॉ. आंबेडकर रोड, ताल हॉटेल ते पुष्पराज हॉटेल या मार्गावर चालकाने टँकर बेदरकारपणे चालविल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिक आणि रिक्षाचालकांनी टँकरचालकाचा पाठलाग केला. टँकर डिव्हायडरला धडकल्यानंतर नागरिकांनी चालकाला पकडले. संतप्त नागरिकांनी चालकाला चोप देत महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे. अपघातात जखमी झालेले नागरिक आणि रिक्षाचालक तक्रार देण्यासाठी महात्मा फुले पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या तक्रारीवरून टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.