अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला
Published on

अज्ञातांच्या मृतदेहांमुळे धावपळ
ओळख पटवण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान

मनोर, ता. ३० ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कुडे गावाच्या हद्दीत एक तर दुसरा मृतदेह मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदगावच्या गणपती मंदिर परिसरात कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
कुडे गावाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद आहे; पण अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटली नसल्याने संबंधित व्यक्ती कोणत्या परिस्थितीत मृत्युमुखी पडली, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. तर दुसरी घटना मनोर पोलिस ठाणे हद्दीतील नांदगावच्या गणपती मंदिर परिसरातील असून गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या व्यक्तीचे अंदाजे वय ४५ ते ५० वर्षे आहे. तसेच घटनास्थळी तपकिरी रंगाचे काळ्या पट्ट्यांची जुनी पादत्राणे आढळली आहेत. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.
------------------------
संपर्काचे आवाहन
मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून त्याचे नातेवाईक किंवा परिचितांनी मनोर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच कोणतीही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com