

सशस्त्र दरोड्याप्रकरणी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या
उरण, ता. ३० (बातमीदार) ः उलवेतील गव्हाण गावात सशस्त्र घरफोडी करीत नऊ लाखांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्यात वापरलेली कार, दुचाकी, चार मोबाईल आणि रोख रकमेसह सुमारे ८.६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गव्हाण येथील शेवंती कोळी घरात एकट्या राहत असल्याची माहिती आरोपींनी रेकी करून मिळवली होती. त्यानुसार १८ ऑगस्टला मध्यरात्री आरोपींनी कौले काढून घरात प्रवेश केला व कोळी यांना चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने व रोकड असा नऊ लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला. उपायुक्त अमित काळे, न्हावा शेवा बंदर विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय चौधरी, वरिष्ठ निरीक्षक अर्जुन रजाने आणि गुन्हे विभागाच्या निरीक्षक अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवली. गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून बदलापूर-ठाणे येथे जाऊन रोहित मालुसरे आणि सूरज गायकवाड या दोघांना गुन्ह्यात वापरलेल्या कारसह ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, गव्हाण गावातील दीपेश भोईर, प्रवीण कोळी आणि फरहान अल्ताफ शेख यांना ताब्यात घेतले. त्यांनी दरोड्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचे अन्य चार साथीदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.