एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून पैसे काढणाऱ्या बिहारमधील चौघांना अटक

एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून पैसे काढणाऱ्या बिहारमधील चौघांना अटक
Published on

एटीएममधून पैसे काढणाऱ्या चौघांना अटक

कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून पैसे काढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील चाैघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींचे नाव किंवा फोटो नसतानाही पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका आरोपीकडून मिळालेल्या मर्यादित माहितीच्या आधारे भिवंडी ते कसारा रेल्वे स्थानकापर्यंत शोध मोहीम राबवून फरार तिघांना धावत्या एक्स्प्रेसमधून पकडण्यात यश मिळविले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २९) पोलिस उपनिरीक्षक जे. डी. सापटे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांना काही व्यक्ती एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून पैसे काढत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि एका संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपल्यासोबत आणखी तीन साथीदार असल्याचे सांगितले. हे तिघे घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे भिवंडीतील कोनगाव परिसरात त्यांचा शोध घेतला; मात्र आरोपी पसार झाले होते. यानंतर पोलिसांनी भिवंडीपासून कसारा रेल्वे स्थानकापर्यंत आरोपींचा शोध घेतला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजेशकुमार रामलालप्रसाद यादव (वय ३१), हरीराम कुमार उमेश सिंह (२५), रोहितकुमार बिनोद सिंह (२६) आणि सुदीपकुमार सुरेंद्र विश्वकर्मा ऊर्फ सुरदीप (२६) यांचा समावेश आहे. हे सर्व मूळचे बिहारचे असून सध्या भिवंडीतील कोनगाव परिसरात राहत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com