

मुरबाड, ता. १ (वार्ताहर) : केंद्र सरकारच्या ‘खत विक्रीसाठीची चौकट’ प्रणालीद्वारे ठाणे जिल्ह्यात २७ ऑगस्टपासून खतविक्रीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या आवश्यक खताचे बुकिंग करता येणार असून, त्यानंतर मिळालेला क्यूआर सांकेतांक निवडलेल्या कृषी सेवा केंद्रावर दाखवून खत खरेदी करता येणार आहे.
खत विक्री व वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, शेतकऱ्यांना गरजेनुसार खत उपलब्ध करून देणे आणि वितरण व्यवस्थेचे प्रभावी व्यवस्थापन करणे हा या प्रणालीचा उद्देश आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, त्रास आणि खर्च वाचणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी टोकावडे येथील विशे अग्रो सेंटर, तर कृषी विकास अधिकारी मुनिर बाचोटीकर यांनी बरडपाडा येथील पोगेरे अग्रो सेंटर येथे उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना प्रणालीची माहिती देण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच तालुका व जिल्हास्तरावर मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
आवाहन
शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीवरील दुकानातून हे अर्ज प्रणालीचे साधन घेऊन कृषी संचय ओळख क्रमांक किंवा आधारद्वारे नोंदणी करावी. जमिनीची व पिकांची माहिती सत्यापित करून आवश्यक खतासाठी अर्ज करता येईल. तयार झालेल्या क्यूआर सांकेतांकाची मुदत तीन दिवसांची असेल. त्यानंतर खत खरेदीसाठी नवीन संकेतांक तयार करावा लागेल. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.