नेरुळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार चालू असताना प्लास्टर कोसळण्याची घटना

नेरुळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार चालू असताना प्लास्टर कोसळण्याची घटना
Published on

नेरूळ स्मशानभूमीतील प्लास्टर कोसळले
अंत्यसंस्कार चालू असतानाच पडझड

बेलापूर, ता. ३१ (बातमीदार) ः नवी मुंबई शहरात अनेक जीर्ण इमारती असल्याने पावसाळ्याच्या दिवसात विविध ठिकाणी प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडतात. अशातच सोमवारी (ता. ३१) दुपारच्या सुमारास नेरूळ सेक्टर चार परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार चालू असताना प्लास्टर कोसळल्याची घटना घडली.
नेरूळ सेक्टर चार परिसरातील स्मशानभूमीत जुईनगर, नेरूळ परिसरातून नागरिक येत असतात. अलीकडेच पालिकेच्या अंतर्गत तीन वर्षांपूर्वी या स्मशानभूमीचा जीर्णोद्धार करण्यात आला. या वेळी अनेक लहान-मोठी कामे करण्यात आली. यामध्ये प्लास्टरचादेखील समावेश होता; मात्र सोमवारी अंत्यसंस्कार चालू असताना प्लास्टर कोसळल्याची घटना घडली. आगीच्या वाफेने प्लास्टर गळतीला आल्याने ही घटना घडली असावी, असे तेथील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाची तसेच कामाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
-------------------------
नेरूळ सेक्टर चार परिसरातील स्मशानभूमीत हिंदू बांधवांचे अंत्यसंस्कार विधी पार पडतात. अलीकडेच या ठिकाणी विविध कामे करण्यात आली आहेत; मात्र प्लास्टर पडण्याच्या घटनेबाबत पालिकेने कामाचा दर्जा तपासावा, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते.
- सस्मित भोईर, युवा सेना उप विधानसभा अधिकारी, बेलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com