बॅटरी, प्लॅस्टिक पुनर्वापर स्वयंपूर्ण भारताचा पाया

बॅटरी, प्लॅस्टिक पुनर्वापर स्वयंपूर्ण भारताचा पाया
Published on

मुंबई, ता. ३ : भारतातील पुनर्वापर (रिसायकलिंग) क्षेत्राचा पुढील टप्पा केवळ प्रमाण वाढवण्यावर नव्हे, तर प्रगत तंत्रज्ञान, गुणवत्ता, घटकांची शुद्धता आणि संकलन व्यवस्था अधिक बळकट करण्यावर केंद्रित असेल. यामुळे आयात कच्च्या मालावरील अवलंबित्व कमी होईल तसेच मजबूत आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था निर्माण होईल, असे या विषयावरील परिसंवादात तज्ज्ञांनी सांगितले.

मीडिया फ्यूजन आणि क्रेन कम्युनिकेशन्सद्वारे आयोजित ‘प्लॅस्टिक्स रिसायकलिंग शो इंडिया’ २०२६ आणि ‘भारत रिसायकलिंग शो’ २०२६ मध्ये मान्यवरांनी ही मते मांडली. हा तीनदिवसीय एक्स्पो ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान मुंबईत पार पडला. यामध्ये १५०हून अधिक प्रदर्शक आणि २५०हून अधिक ब्रँड्स प्लॅस्टिक, धातू, ई-कचरा आणि बॅटरी पुनर्वापराच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करीत आहेत.

मीडिया फ्यूजनचे व्यवस्थापकीय संचालक ताहेर पात्रावाला म्हणाले, की भारतातील विखुरलेल्या पुनर्वापर परिसंस्थेला एकत्र आणण्याच्या दिशेने हा कार्यक्रम म्हणजे निर्णायक पाऊल आहे. जसजशी नियामक चौकट अधिक कठोर होत आहे आणि उद्योगांवर शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्याचा दबाव वाढत आहे तसतशी ही दोन्ही व्यासपीठे तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि आंतरक्षेत्रीय भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी एक अचूक माध्यम ठरतात.

‘भारताच्या पुनर्वापर क्षेत्राच्या वाढीचा पुढील टप्पा केवळ प्रमाणावर नव्हे, तर गुणवत्ता, ट्रेसेबिलिटी आणि तंत्रज्ञानावर आधारित असेल. २०३० पर्यंत भारताची तांब्याची (कॉपर) मागणी ३.२ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे,’ असे मॅकिन्से अँड कंपनीचे वरिष्ठ सल्लागार आर. व्ही. श्रीधर यांनी सांगितले.

असोसिएशन ऑफ प्लॅस्टिक रिसायकलर्स भारताचे महासंचालक शैलेंद्र सिंह म्हणाले, की कडक ईपीआर नियम, अनिवार्य रिसायकल-कंटेंट मानके आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे गेल्या दशकात भारताच्या प्लॅस्टिक रिसायकलिंग परिसंस्थेत मोठा बदल घडून आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com