ट्रेन पकडण्याच्या घाईत दिव्यांगाने थेट रुळ ओलांडले; अंबरनाथ स्थानकात थरारक प्रकार

ट्रेन पकडण्याच्या घाईत दिव्यांगाने थेट रुळ ओलांडले; अंबरनाथ स्थानकात थरारक प्रकार
Published on

लोकलसाठी दिव्यांगाचा जीव पणाला
हातात वॉकर घेऊन रूळ ओलांडला; प्रवाशांमुळे अनर्थ टळला
अंबरनाथ, ता. ३ (वार्ताहर) : रेल्वे लोकल पकडण्याच्या घाईत दिव्यांग प्रवासी रूळ ओलांडून एका फलाटावरून दुसऱ्या फलाटाकडे जात होता. हातात वॉकर असतानाही जीवाची पर्वा न करता रूळ ओलांडणाऱ्या या प्रवाशाच्या दिशेने त्याचवेळी लोकल येत असल्याची घोषणा झाली. त्यामुळे स्थानकावरील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्याला मदत केली. लोकल चालकानेही वेळीच ब्रेक लावल्याने अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा प्रकार बुधवारी (ता. २) दुपारी अंबरनाथ स्थानकात घडला.
सध्या स्थानकात विविध विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे फलाट क्रमांक १ आणि २ दरम्यान ये-जा करताना दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यासाठी सुलभ आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध नसल्याने काही प्रवाशांकडून धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेषतः दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प, लिफ्ट अथवा इतर आवश्यक सुविधा सहज उपलब्ध नसतील, तर त्यांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाणे जिकिरीचे ठरत आहे. प्रवाशांनी जीव धोक्यात घालून रूळ ओलांडू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते. तर सूचना देण्यापेक्षा दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com