

लोकल विलंबाने डाेंबिवली, आंबिवलीत उद्रेक
रेल्वे ब्लॉकमुळे तीन दिवसांपासून प्रवाशांना मनस्ताप
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : कल्याण-कसारा मार्गावर तीन दिवस सुरू असलेल्या रेल्वेच्या विशेष ब्लॉकमुळे लाेकल विलंबामुळे गुरुवारी (ता. ३) सकाळी ९ च्या सुमारास डोंबिवली स्थानकात प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. या वेळी रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविरोधात जाेरदार घोषणाबाजी करण्यात आली. दुसरीकडे दुपारी आंबिवली स्थानकातही लोकल तासभर उशिरा पाेहोचल्याने प्रवाशांनी स्टेशन मास्टर कार्यालयाबाहेर गर्दी करून गोंधळ घातला. अखेर आरपीएफ आणि जीआरपीचे जवानांनी हस्तक्षेप करून संतप्त प्रवाशांना शांत केले.
आंबिवली स्थानकात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने प्रवासी स्टेशन मास्तर कार्यालयाबाहेर जमा झाले. लोकल तासभर उशिराने धावत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला. तसेच लोकल उशिराने धावणार असल्याची किंवा वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलांची योग्य माहिती वेळेत दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. डाेंबिवलीतील घटनेचा व्हिडिओ काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रित करून समाजमाध्यमांवर प्रसारित केला असून,
परिस्थिती लक्षात घेऊन आरपीएफ आणि जीआरपीचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, डोंबिवली स्थानकातही लोकल सेवेतील विलंबामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. रेल्वे प्रशासनाने ब्लॉकदरम्यानच्या बदलांची माहिती प्रवाशांना वेळेत आणि स्पष्टपणे द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली.
--------------
१५ डब्यांच्या लोकलसाठी टिटवाळा स्थानकातील काम
टिटवाळा स्थानकात १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटाचा विस्तार करण्याचे काम रेल्वेकडून सुरू आहे. या कामासाठी २८-२९ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ११-१२ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात २-३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ८-९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत रात्रीच्या वेळेत कल्याण-टिटवाळा-कसारा मार्गावरील लोकल सेवांवर परिणाम होणार आहे.
----------------------
टिटवाळा स्थानकातील फलाट विस्ताराचे काम भविष्यात प्रवाशांना अधिक चांगली सुविधा मिळावी, यासाठी करण्यात येत आहे. कामाच्या काळात काही प्रमाणात गैरसोय होणे अपेक्षित असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.
- पी. डी. पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.