कामास विरोध करत जेसीबी चालकाला मारहाण

कामास विरोध करत जेसीबी चालकाला मारहाण
Published on

भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) : मानकोली-हायवे दिवे परिसरात विकसकाच्या जागेवर काम करण्यास विरोध करत स्थानिकांनी जेसीबी चालकाला अडवून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यावेळी जेसीबीचीही तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. यशवंत मोर्या असे जखमी चालकाचे नाव आहे.

मानकोली ते हायवे दिवे परिसरात २५ वर्षांपासून गोदाम संकुल उभारण्याचे काम करणाऱ्या इंडियन कॉर्पोरेशनचे मालक रुद्रप्रताप त्रिपाठी यांच्याकडून स्थानिकांच्या जमिनी विकसित केल्या जात आहेत. या ठिकाणी विविध बांधकामांची कामे स्थानिकांकडून केली जात होती. मात्र, कामात फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीने स्वतःचा जेसीबी खरेदी करून काम सुरू केले. त्यामुळे स्थानिकांचा व्यवसाय बंद झाल्याने वरुण म्हात्रे व त्याच्या साथीदारांनी जेसीबी घेऊन जात असलेल्या चालक मोर्या यांना रस्त्यात अडवले. त्यांना मारहाण करून जेसीबीची तोडफोड केली. या घटनेप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने ठाणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.

यापूर्वीही हल्ला
या हल्ल्यापूर्वी जुलै महिन्यात दोन वेळा मोर्या यांना मारहाण करून धमकावण्यात आले होते. त्यावेळीही पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, वेळीच कारवाई न झाल्याने आरोपींची हिंमत वाढली आणि त्यातून हा हल्ला झाल्याचा आरोप इंडियन कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप नवल यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com