‘गोविंदा’ तब्बल १७ वर्षे बिछान्यावर

‘गोविंदा’ तब्बल १७ वर्षे बिछान्यावर
Published on

‘गोविंदा’ तब्बल १७ वर्षे बिछान्यावर
आईची आर्त हाक ः उपचारांची जबाबदारी घ्या!

भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) ः ‘‘दहीहंडीच्या एका अपघाताने माझ्या मुलाचे संपूर्ण आयुष्य उद्‍ध्वस्त झाले. १७ वर्षे तो बिछान्यावर आहे. उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाले. आता आम्ही हतबल झालो आहोत. आम्हाला आर्थिक मदत नको; मात्र त्याच्या उपचारांचा खर्च भागविण्याची सरकारने व्यवस्था करावी,’’ अशी मागणी नागेश भोईर यांच्या आईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नागेश भोईर व त्याचा परिवार सध्या भिवंडीतील गौरीपाडा कणेरी परिसरात राहत आहे. औषधोपचारावर येणाऱ्या खर्चामुळे भोईर परिवार प्रचंड आर्थिक संकटात आहे. वयाच्या २४व्या वर्षी २००९मध्ये दहीहंडीच्या मनोऱ्यावरून पडल्याने नागेश गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर त्याच्या आयुष्याला कायमचा ब्रेक लागला. गेल्या अनेक वर्षांपासून तो बिछान्यावर असून दैनंदिन जीवनासाठीही कुटुंबीयांवर अवलंबून आहे. उपचारांसाठी नियमित रुग्णालयात जावे लागते. दोन महिन्यांतून एकदा उपचारांची गरज भासत असून त्यासाठी मोठा खर्च येत असल्याचे त्यांच्या आईने सांगितले. नागेशच्या उपचारासाठी अनेकांनी मदतीची आश्वासने दिली, तर काहींनी प्रत्यक्षात मदतही केली. अनेक वेळा त्याचे मित्रही आर्थिक मदत करतात; मात्र ती अपुरी पडते. नागेशचे वडील खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. आता ते निवृत्त आहेत. आई-वडील व मोठी बहीण असा परिवार असून मुलाच्या दीर्घकाळच्या उपचारांमुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.
...
जीव धोक्यात घालू नका!
दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा करा; मात्र सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका. एका क्षणाच्या अपघातामुळे केवळ एका गोविंदाचे नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून जाते. त्यामुळे मनोरे रचा; पण जीव धोक्यात घालू नका, असा भावनिक सल्ला नागेश भोईर यांनी सर्व गोविंदांना दिला आहे.
...
लक्ष देतील का?
दहीहंडीच्या उत्सवात राजकीय स्पर्धा वाढली असून बक्षिसांच्या खैराती केल्या जात आहेत; मात्र मागील १७ वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या नागेश भोईर यांच्याकडे सरकार, लोकप्रतिनिधी व दहीहंडी आयोजक आता तरी लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com