

खारीगावातील अपघातात पादचारी
महिलेचा मृत्यू; दोघे जखमी
कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन दुचाकी, कारना धडक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे/कळवा, ता. ६ : खारीगावात कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात भीषण अपघात झाला. या अपघातात पादचारी महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य एक पादचारी महिला आणि दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. शुभांगी पाटील (वय ४५) असे मृत महिलेचे नाव असून मालाश्री पुजारी (३२) आणि दुचाकीस्वार आयुष पाटील (२८) अशी जखमींची नावे आहेत. तिघेही खारीगाव परिसरातील रहिवासी आहेत.
कारचालक अभिषेक कदम (३१, रा. कुर्ला) याला याप्रकरणी कळवा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक ठाण्यातील आतेभावाकडे आला होता. रविवारी सकाळी तो भरधाव वेगाने कार घेऊन निघाला असताना खारीगाव परिसरात अचानक त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहनाने दोन पादचारी महिला, दोन दुचाकी आणि दोन कारना धडक दिली. या अपघातात शुभांगी पाटील यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मालाश्री पुजारी आणि आयुष पाटील हे दोघेही या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात काही वाहनांचेही नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.