उत्तर-पश्चिम मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना गती

उत्तर-पश्चिम मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना गती
Published on

उत्तर-पश्चिम मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना गती
एसआरए, पुनर्विकासासह नागरी प्रश्नांवर निर्णय; शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठक
जोगेश्‍वरी, ता. ८ (बातमीदार) ः उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील एसआरए, पुनर्विकास व विविध नागरी प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मॅरेथॉन बैठकीत २६ हून अधिक प्रश्नांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. खासदार रवींद्र वायकर यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.
आरेतील रॉयल पाम प्रकल्पातील अनागोंदी, अनियमितता व अनधिकृत बांधकामांचे संपूर्ण ऑडिट करून व्हिजिलन्समार्फत चौकशी करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. अंधेरी पूर्व पीएमजीपीतील रहिवाशांना ४४८ ऐवजी ५०० चौरस फुटांची सदनिका आणि भाडे २० हजारांऐवजी २५ हजार रुपये देण्याबाबत म्हाडाने अभ्यास करून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे ठरले.
भगतसिंगनगर येथील विकसक दत्तानी यांच्या विरोधात १३ (२)ची कारवाई करण्यात आली असून, एमआरटीपी गुन्हाही दाखल आहे. आता एफआयआर दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले. दुर्गानगरमधील उर्वरित ना-विकास क्षेत्र लवकरच उठविण्याचा निर्णय अपेक्षित आहे. ओशिवरा गजानन (सहयोग होम्स) व राघवेंद्र नगर पुनर्विकासाची चौकशी, अपात्रांना सदनिका देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई, तसेच कोयनानगर विकसकाविरोधात महिनाभरात १३(२)ची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. आरे मयूरनगरचा ‘हाउसिंग फॉर ऑल’अंतर्गत पुनर्विकास, त्रिचरणमधील पात्र १४७ रहिवाशांचे पीएपीद्वारे पुनर्वसन आणि फोर्स वन परिसरातील झोपड्यांचे म्हाडामार्फत पुनर्वसन करण्याचेही ठरले.
आप्पापाडा येथे मूलभूत सुविधांसाठी संयुक्त प्रकल्प अहवाल, आरेतील सुमारे १० हजार झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी एसआरए प्रकल्प अहवाल, तर शिवदर्शन प्रकल्पाबाबत शासनाची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडण्याचे निर्देश देण्यात आले. जुहू मेट्रो स्थानकाला ‘हरे रामा हरे कृष्णा’ नामकरणाच्या प्रस्तावास मंजुरी देऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. जोगेश्वरी व महाकाली गुंफांच्या पर्यटन विकासासाठी निधी देण्याचे आश्वासनही शिंदे यांनी दिले गोरेगाव पूर्व सर्वोदय नगरातील प्रकल्पबाधित सहा रहिवाशांना पीएपी सदनिकांच्या चाव्या शिंदे यांच्या हस्ते देण्यात आल्या. आकार निर्माण एसआरए इमारतीतील ७० सदनिकांपैकी उर्वरित ६४ रहिवाशांनाही लवकरच चाव्या देण्यात येणार आहेत. बैठकीस आसीम गुप्ता, महेंद्र कल्याणकर, मिलिंद बोरीकर, अनिरुद्ध नारकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com