‘एमपीएससी’ अध्यक्षांना ‘खास’ असल्याने अभय : हर्षवर्धन सपकाळ

‘एमपीएससी’ अध्यक्षांना ‘खास’ असल्याने अभय : हर्षवर्धन सपकाळ
Published on

‘एमपीएससी’ अध्यक्षांना ‘खास’ असल्याने अभय : हर्षवर्धन सपकाळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : ‘‘एमपीएससी’च्या कारभाराविरोधात राज्यभरात लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले तरीही सरकारला जाग येत नाही. एमपीएससीचे अध्यक्ष व सचिव यांची हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे, पण अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचे खास असल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत नाही का,’ असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत सपकाळ म्हणाले की, ‘एमपीएससीच्या गोंधळावर काँग्रेस पक्षाने सातत्याने विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आवाज उठवला आहे, पण कारभार काही सुधारत नाही. एमपीएससीच्या या कारभाराला कंटाळून धाराशीव जिल्ह्यातील प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले. ही आत्महत्या केली नसून हा सरकार व एमपीएससीच्या अनास्थेचा बळी आहे. या हत्येस जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,’ अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.


तीन कोटी मतदार वगळले?
राज्यातील ‘एसआयआर’ मोहिमेतून तब्बल तीन कोटींपेक्षा जास्त मतदारांची नावे विविध कारणाने वगळली आहेत. यामध्ये दोन कोटी सहा लाख मतदार, गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदार म्हणून वगळले आहेत. एक कोटी २२ लाख मतदारांची नावे ही संदिग्ध स्वरूपाचे कारण देऊन वगळली, ती यादी निवडणूक आयोग जाहीर करत नाही. याबद्दल आयोगाने खुलासा केला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली. तसेच निवडणूक आयोगाने दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे, पण या कालावधीमध्ये राज्यात गौरी गणपतीसह अनेक सण व उत्सव आहेत. त्यामुळे मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com