टीएचआरला नवी चव, पोषणाला नवी दिशा!

टीएचआरला नवी चव, पोषणाला नवी दिशा!
Published on

टीएचआरला नवी चव, पोषणाला नवी दिशा..!

वाघाडीत १४ गटांची ‘पोषण रसोई’ स्पर्धा; स्थानिक घटकांपासून पौष्टिक पदार्थांची निर्मिती

कासा, ता. ९ : (बातमीदार) : अंगणवाडीमार्फत बालके, गरोदर व स्तनदा मातांना देण्यात येणाऱ्या टीएचआरचा (टेक होम रेशन) योग्य व प्रभावी वापर व्हावा, तसेच त्याबाबतचे गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशाने वाघाडी समाजहॉल येथे ‘पोषण रसोई’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पोषण माह २०२६ निमित्त आरोहन संस्था व के. कॉर्प चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमाला माता, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टीएचआरसोबत स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असलेल्या पौष्टिक घटकांचा वापर करून सहभागी गटांनी विविध पदार्थ तयार केले. प्रत्येक गटाने पदार्थ तयार करण्याची पद्धत, वापरलेले घटक, पोषणमूल्य आणि बालके व मातांसाठी त्याचे महत्त्व याबाबत माहिती दिली. त्यामुळे टीएचआरचा दैनंदिन आहारात प्रभावी वापर करण्याबाबत जनजागृती झाली. सायवन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महिंद्र नवरे यांनी घरच्या घरी उपलब्ध खाद्यघटकांपासून पौष्टिक आहार तयार करण्याचे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्र, कोसबाडच्या पोषणतज्ज्ञ रूपाली देशमुख यांनी टीएचआरचा नियमित व योग्य वापर करण्याचे आवाहन केले. फास्ट फूडऐवजी स्थानिक व घरगुती पौष्टिक पदार्थांना प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सरपंच प्रशांत सातवी, अंगणवाडी मुख्य सेविका पूर्वा पाटील, डॉ. अंकिता भोये, प्रकल्प व्यवस्थापक सुजाता आयरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत गावित यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com