

गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि एमएमआर परिसरातील सोसायट्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी ‘सकाळ’ आणि ‘माझा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सोसायटी आनंदोत्सव’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सोसायट्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार असून, बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी रितेश आणि जेनेलिया देशमुख यांना भेटण्याचीही विशेष संधी उपलब्ध होणार आहे.
पहिल्या क्रमांकाला ५० हजारांचे व्हाउचर
‘सोसायटी आनंदोत्सव’ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सोसायट्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
प्रथम क्रमांक : ५०,००० किमतीचे व्हाउचर्स
द्वितीय क्रमांक : २५,००० किमतीचे व्हाउचर्स
तृतीय क्रमांक : १०,००० किमतीचे व्हाउचर्स
ही बक्षिसे ॲमेझॉन व्हाउचर्सच्या स्वरूपात दिली जाणार आहेत.
ही स्पर्धा केवळ मुंबई एमएमआर (MMR) क्षेत्रातील सोसायट्यांसाठी खुली आहे. स्पर्धेचा कालावधी ६ सप्टेंबर २०२६ ते १६ सप्टेंबर २०२६ असा आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोसायट्यांनी संबंधित जाहिरातीमध्ये दिलेला QR कोड स्कॅन करून अधिकृत नोंदणी पूर्ण करावी अथवा खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरावा.
नोंदणीसाठी लिंक : https://forms.gle/y९SBffYkqN८bhBZg८
नियम आणि अटी (T&C):
ही स्पर्धा ६ सप्टेंबर २०२६ ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत फक्त मुंबई एमएमआर (MMR) क्षेत्रासाठीच वैध आहे.
बक्षीस म्हणून मिळणारे व्हाउचर हे ॲमेझॉन (Amazon)चे व्हाउचर असून, ते ॲमेझॉन प्लॅटफॉर्मवर रिडीम (वापरता) करता येईल.
स्पर्धेचे नियम, अटी आणि सहभागासंदर्भातील अधिक माहितीसाठी ‘माझा’च्या अधिकृत सोशल मीडिया पेजला भेट द्या. https://www.instagram.com/maazaindia/
यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या सोसायटीचा उत्साह आणि सजावट आणखी आकर्षक करण्यासाठी तसेच खास बक्षिसे आणि रितेश-जेनेलिया देशमुख यांना भेटण्याची संधी मिळवण्यासाठी मुंबई-एमएमआरमधील जास्तीत जास्त सोसायट्यांनी ‘सोसायटी आनंदोत्सव’ स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.