साखर फुटाणे महागले; किलोमागे ४० ते ५० रुपयांची वाढ

साखर फुटाणे महागले; किलोमागे ४० ते ५० रुपयांची वाढ
Published on

साखर-फुटाणे महागले
किलोमागे ४० ते ५० रुपयांची वाढ
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) ः श्री गणरायाला नैवेद्य आणि भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या साखर-फुटाण्याच्या दरात यंदा मोठी वाढ झाली आहे. साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम साखर-फुटाण्याच्या उत्पादन खर्चावर झाल्याने किलोमागे सुमारे ४० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात साखर-फुटाण्याला विशेष मागणी असते. घरगुती गणेशोत्सवासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही भाविकांना प्रसाद म्हणून साखर-फुटाणे वाटले जातात. त्यामुळे उत्सवाच्या दिवसांत विक्री मोठ्या प्रमाणात वाढते. यंदा साखरेच्या दरात झालेल्या वाढीमुळे साखर-फुटाण्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी, किलोमागे ४० ते ५० रुपयांनी दर वाढले आहेत. पूर्वी सुमारे १५० रुपये किलो दराने मिळणारे साखर-फुटाणे आता १९० ते २०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. साखरेबरोबरच उत्पादन, वाहतूक आणि इतर खर्च वाढल्याने दरवाढ करावी लागल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

कमी साखरेच्या मिठाईंना मागणी अधिक
ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांमध्येही कमी साखरेच्या मिठाईंना अधिक मागणी आहे. पेढा, लिची, स्ट्रॉबेरी, आंबा, ग्रीन ॲपल, ॲपल यांसारख्या विविध फळांच्या स्वादातील मिठाई बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. मिठाई विक्रेत्यांकडून ग्राहकांची बदलती पसंती लक्षात घेऊन विविध प्रकार उपलब्ध करून दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com