

ठाणे, ता. १५ : यंदा गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच गणेशभक्तांसाठी पुढील वर्षाची आनंदाची बातमी समोर आली आहे. पुढील वर्षी गणरायाचे आगमन ४ सप्टेंबर २०२७ रोजी होणार असून, यंदाच्या तुलनेत तब्बल १० दिवस आधी गणेशाची मूर्ती घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांत मोठ्या थाटात विराजमान होणार आहेत.
एकीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. अशातच सोमवारी (ता. १४) गाजतवाजत लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर आज (ता. १५) दीड दिवसाची सेवा केल्यानंतर विनायकाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे. गणेशभक्तांच्या नजरा आता पुढील वर्षाच्या उत्सवाकडे वळल्या आहेत. अशातच पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी पुढील वर्षांसह ११ वर्षांच्या गणेश चतुर्थीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२७ मध्ये ४ सप्टेंबर, २०२८ मध्ये २३ ऑगस्ट, २०२९ मध्ये ११ सप्टेंबर, २०३० मध्ये १ सप्टेंबर, २०३१ मध्ये २० सप्टेंबर, २०३२ मध्ये ८ सप्टेंबर, २०३३ मध्ये २८ ऑगस्ट, २०३४ मध्ये १६ सप्टेंबर, २०३५ मध्ये ५ सप्टेंबर, २०३६ मध्ये २४ ऑगस्ट आणि २०३७ मध्ये १२ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.