हुंडा आणि मुलगी झाल्याच्या जाचाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या,

हुंडा आणि मुलगी झाल्याच्या जाचाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या,
Published on

हुंडा, मुलगी झाल्याच्या जाचाला
कंटाळून विवाहितेने संपवले जीवन

उल्हासनगर, ता. १५ (बातमीदार) : हुंड्यासाठी तसेच मुलगी झाल्याने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून २८ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उल्हासनगरात घडली. या घटनेमुळे तिच्या नऊ महिन्यांच्या चिमुकलीचे आईचे छत्र हरपले. मुलीला माहेरी नेण्यासाठी दिल्लीहून वडील उल्हासनगरला येत असतानाच ही घटना घडल्याने त्यांनी हंबरडा फोडला.

नित्या हरीसेवक राय हिचा विवाह डिसेंबर २०२१मध्ये उल्हासनगरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर गौरव संजय राय याच्याशी झाला होता. नित्या एमएससी बीएडपर्यंत शिकली होती. लग्नावेळी तिच्या वडिलांनी सुमारे पावणेचार लाख रुपये रोख हुंडा, संसारोपयोगी साहित्य आणि लग्नाचा संपूर्ण खर्च केला होता. त्यानंतरही हुंड्यासाठी तिचा छळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. घरातील काम व्यवस्थित करीत नसल्याचे कारण देत सुरुवातीला तिच्याशी वाद घातले जात होते. त्यानंतर माहेरहून आणखी हुंडा घेऊन येण्याची मागणी करण्यात आली. तसेच मुलगी झाल्याने सासू माधुरी राय आणि आजी सासू शारदा राय यांनीही नित्याला त्रास दिल्याचा आरोप तिचे वडील माधवे हरीसेवक राय यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केला आहे.

----
पतीला अटक
नित्याने फोन करून होत असलेल्या त्रासाची माहिती वडिलांना दिली होती. तिला माहेरी नेण्यासाठी ते दिल्लीहून निघाले होते; मात्र उल्हासनगरला पोहोचण्यापूर्वीच नित्याने आत्महत्या केल्याची माहिती त्यांना मिळाली. सहाय्यक पोलिस आयुक्त शंकर अवताडे आणि मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कोळी यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी गौरव राय, माधुरी संजय राय आणि शारदा राय यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव राय याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com