रिटघरचा ‘एक गाव, एक गणपती’

रिटघरचा ‘एक गाव, एक गणपती’
Published on

रिटघरचा ‘एक गाव, एक गणपती’
एकोप्याचे प्रतीक ठरलेला गणेशोत्सव; सर्व समाजबांधवांचा सहभाग
पनवेल, ता. १७ (बातमीदार) : तालुक्यातील रिटघर गावाने गेल्या ५२ वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ ही आगळीवेगळी परंपरा जपली आहे. जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गावातील सुमारे ४०० घरांतील नागरिक, सर्वधर्मीय समाजबांधव एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
१९७५ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गावातील काही जाणकार मंडळींनी अवाजवी खर्चाला फाटा देत ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना मांडली. त्यानंतर या संकल्पनेला गावकऱ्यांनी स्वीकारले आणि गेल्या ५२ वर्षांपासून ती सातत्याने जोपासली जात आहे. गणेशोत्सव म्हटला की गावागावात, पाडोपाड्यात आणि गल्लोगल्ली विविध ठिकाणी गणेशमूर्तींची स्थापना केली जाते. रिटघरमध्ये मात्र आजही कोणत्याच घरात घरगुती गणपतीची स्थापना केली जात नाही. संपूर्ण गावात सुमारे ४०० घरे असून, लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात रामायणावर आधारित आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे, अशी माहिती गावचे सरपंच सुभाष भोपी यांनी दिली.

भजन, कीर्तनामुळे भक्तिमय वातावरण
गणेशोत्सव काळात सालाबादप्रमाणे गावात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज भजन, कीर्तन आणि काकड आरती होत आहे. तसेच गणपती व गौरी उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक खेळांचे आयोजन केले जाते.
जाणता राजा मित्रमंडळ, महिला मंडळ, ब्रास बॅन्ड, भारूड मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या सहभागातून उत्सवाची सांगता केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com