

तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनाचे बांधकाम पूर्ण होऊनही त्याच्या लोकार्पणाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तसेच ऐरोली येथील मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्राचे कामही प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. या दोन्ही बाबींची दखल घेत महाराष्ट्र भवनाच्या लोकार्पणाची निश्चित तारीख जाहीर करावी आणि मराठी भाषा भवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.
वाशी येथे आयोजित अखिल भारतीय हिंदी राजभाषा संमेलनासाठी शहा नुकतेच नवी मुंबईत आले होते. या पार्श्वभूमीवर ‘मनसे’चे राज्य प्रवक्ते तथा नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी शहा यांना पत्र पाठवून महाराष्ट्र भवन आणि मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या रखडलेल्या कामांकडे लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्र भवन हे राज्यातील नागरिकांसाठी सांस्कृतिक व सामाजिक ओळखीचे केंद्र ठरणार आहे. मराठी भाषा, साहित्य, कला, उद्योग तसेच पर्यटनाची ओळख देशभर पोहोचविण्यासाठीही या वास्तूची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे महाराष्ट्र भवनाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या लोकार्पणाची तारीख स्पष्ट करावी, अशी मागणी काळे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.