

दिव्यात सँडविच विक्रेत्याचा संशयास्पद मृत्यू
गॅसगळतीसह अन्नातून विषबाधेची शक्यता; प्रत्येक खाद्यपदार्थाचे नमुने तपासणीसाठी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : दिवा पूर्वेतील सद्गुरूनगर परिसरात एकाच घरात तीन सँडविच विक्रेते बेशुद्धावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. यातील गोविंद गुप्ता (वय २८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर विशाल जयस्वाल (वय ३५) आणि परवेश जयस्वाल (वय ४०) यांची प्रकृती स्थिर आहे. दोघांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोविंद गुप्ता यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गॅसगळतीसह अन्नातून विषबाधेची शक्यताही तपासली जात आहे. त्यानुसार घटनास्थळी आढळलेल्या प्रत्येक खाद्यपदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिली.
दिवा पूर्वेतील आशापुरा माता को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या तळमजल्यावरील एका घरातून रविवारी (ता. २०) सकाळी उग्र वास येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर घराची पाहणी केली असता तिघेही बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच गोविंद गुप्ता यांचा मृत्यू झाला. तिघेही सँडविच विक्रीचा व्यवसाय करीत असून, ते मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी केली. घरातील विविध खाद्यपदार्थ, पाणी तसेच इतर संशयित वस्तूंचे नमुने घेण्यात आले. घरात आढळलेल्या प्रत्येक खाद्यपदार्थाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. नमुन्यांच्या अहवालातून विषबाधेची शक्यता स्पष्ट होईल, तर वैद्यकीय अहवालानंतर या घटनेमागील नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.