करसवलतीला १३.५७ कोटींचा प्रतिसाद

करसवलतीला १३.५७ कोटींचा प्रतिसाद
Published on: 

उल्हासनगर, ता. २ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी जाहीर केलेल्या सवलत योजनेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात १०० टक्के विलंबशास्ती माफीचा लाभ घेत नागरिकांनी तब्बल १३ कोटी ५७ लाख रुपयांचा थकीत कर भरला. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडली असून, या निधीतून विकासकामांना गती देण्यासह थकीत देणी भागविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांना दिलासा मिळावा, तसेच महापालिकेची करवसुली वाढावी, यासाठी तीन टप्प्यांत ही योजना राबविण्यात येत आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार १२ सप्टेंबरपासून ही सवलत योजना सुरू करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त डॉ. धिरज चव्हाण, उपायुक्त अनंत जवादवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारक व संकलक नीलम कदम आणि पर्यवेक्षक सचिन वानखेडे यांच्या देखरेखीखाली योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात १२ ते २५ सप्टेंबरदरम्यान संपूर्ण थकीत कराची रक्कम एकरकमी भरल्यास १०० टक्के विलंबशास्ती माफ करण्यात आली. त्यानंतर आता ५० टक्के विलंबशास्ती माफीची सवलत ५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेत थकीत कराचा भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कर निर्धारक व संकलक नीलम कदम यांनी केले आहे.

महसुलात वाढ
पहिल्या टप्प्यात मिळालेल्या प्रतिसादामुळे महापालिकेच्या महसुलात वाढ झाली आहे. नागरिकांनी कराची बिले मिळाल्यानंतर वेळेत भरणा केल्यास शहरातील विकासकामांना अधिक गती देता येईल, असे आयुक्त मनीषा आव्हाळे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. धिरज चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com