नारिवली ते डोंबिवली अतिरिक्त बससेवा सुरू

नारिवली ते डोंबिवली अतिरिक्त बससेवा सुरू
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : नवी मुंबईतील १४ गावांमधून डोंबिवलीत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बससेवा उपलब्ध होत नसल्याने दररोज लेट मार्कचा सामना करावा लागत होता. गणेशोत्सवकाळात नारिवली येथे गणपती दर्शनासाठी आलेल्या आमदार राजेश मोरे यांच्याकडे विद्यार्थिनींनी ही समस्या मांडत बससेवा सुरळीत करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत आता नारिवली ते डोंबिवली अतिरिक्त बससेवा सुरू करण्यात आली आहे.
कल्याण ग्रामीण भागातील १४ गावांमधून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी डोंबिवलीत येतात. मात्र, या मार्गावर नियमित आणि वेळेत बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात पोहोचण्यास विलंब होत होता. परिणामी, त्यांना वारंवार लेट मार्कला सामोरे जावे लागत होते. प्रवासातील ही अडचण विद्यार्थ्यांनी आमदार मोरे यांच्यासमोर मांडली होती. विद्यार्थ्यांची समस्या ऐकल्यानंतर मोरे यांनी बससेवा सुरळीत करण्यासाठी तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नारिवली ते डोंबिवली मार्गावर अतिरिक्त बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नारिवली येथे बस दाखल होताच विद्यार्थ्यांसह पालकांनी चालक आणि वाहकांचे स्वागत केले. वेळेत बससेवा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अडचण दूर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com