

गोळी आरोपीलाही लागल्याची शक्यता!
ठाणे, ता. २ : प्रदीप पूर्णेकर यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या वेळी झाडलेली एखादी गोळी आरोपीलाही लागली असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे नवा ट्विस्ट समोर येत आहे, मात्र गोळी नेमकी कोणाला लागली, त्या जखमी झालेल्याने कुठे उपचार घेतले. या संदर्भात ठाणे-मुंबई तसेच आजूबाजूच्या रुग्णालयातील नोंदी तपासण्याचे कामही पोलिसांकडून केले जात आहे. पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करताना झाडलेली एखादी गोळी भिंतीवर किंवा अन्य ठिकाणी आदळून ‘रिव्हर्स’ होऊन आरोपीला लागली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या आरोपींच्या हालचालींबरोबरच गोळी लागून जखमी झालेल्या व्यक्तीने कोणत्या रुग्णालयात उपचार घेतले का, याचीही माहिती घेतली जात आहे. घटनास्थळी आरोपींनी नेमक्या किती गोळ्या झाडल्या, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अटक आरोपींच्या चौकशीतून गोळीबाराचा क्रम, वापरण्यात आलेली शस्त्रे आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे शोधून जप्त करण्याचे आव्हान तपास पथकासमोर आहे. या प्रकरणातील फरार आरोपी संतोष उर्फ टल्ली कनोजिया याच्यासह अन्य एका संशयिताचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.