

आझाद मैदानात आंदोलनास
परवानगी नाकारली
मुंबई, ता. ३ : साहिल वाकोडे याच्या वडिलांना आझाद मैदानात आंदोलन सुरू ठेवण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे ते संस्थेच्या पवई येथील कॅम्पसला भेट देण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या वकिलांनी शनिवारी सांगितले. दुसरीकडे साहिलच्या मृत्यूप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करीत आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका विद्यार्थी संघटनेने १४ दिवस सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र केले आहे.
कुटुंबाच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी रवींद्र वाकोडे यांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे ते आयआयटी मुंबईकडे जाण्याच्या तयारीत होते. वाकोडे दाम्पत्याने गेल्या आठवड्यात आपल्या दिवंगत मुलाला न्याय मिळावा तसेच प्रा. सूर्यनारायण दुल्ला आणि आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांना अटक करावी, या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. रवींद्र वाकोडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पवई पोलिसांनी प्राध्यापक दुल्ला यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील तरतुदींनुसार एफआयआर दाखल केला.
--
प्रा. दुल्ला यांची १० तास चौकशी
तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने प्रा. दुल्ला यांची नुकतीच १० तास चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवला. वृत्तानुसार पोलिसांनी साहिलचे पालक, सहअध्यायी आणि आयआयटी मुंबईच्या वसतिगृहातील कर्मचारी अशा सुमारे ४० जणांचे जबाब नोंदवले. तसेच मृत विद्यार्थ्याची इलेक्ट्रॉनिक उपकरणे न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. मृत विद्यार्थ्याच्या पालकांनी प्रा. दुल्ला यांच्यावर छळ आणि जातीय भेदभावाचे आरोप केले आहेत. चौकशीदरम्यान प्राध्यापक दुल्ला यांनी सर्व आरोप फेटाळून लावले, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांचा जबाब अधिकृतरीत्या नोंदवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.