आंदोलन करणे आमची हौस नाही : अभिजित दीपके आंदोलन करणे आमची हौस नाही : अभिजित दिपके

आंदोलन करणे आमची हौस नाही : अभिजित दीपके
आंदोलन करणे आमची हौस नाही : अभिजित दिपके
Published on: 

आंदोलन करणे आमची हौस नाही : अभिजित दीपके
शिक्षणव्यवस्थेतील सुधारणांसाठी सरकारने संवाद साधावा
मुंबई, ता. ९ : ‘देशातील शाळांची स्थिती सुधारावी, विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे भविष्य सुरक्षित व्हावे, यासाठी सरकारने आंदोलकांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करावी, रस्त्यावर उतरून आंदोलन करणे ही आमची हौस नाही; मात्र शिक्षणव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी संघर्ष करावा लागला, तर आम्ही त्यासाठी तयार आहोत,’ अशी भूमिका कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) अध्यक्ष अभिजित दीपके यांनी शुक्रवारी (ता. ९) मांडली. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमातील चर्चासत्रात शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी, आंदोलनाची भूमिका आणि सीजेपीच्या राजकीय भूमिकेवर चर्चा झाली.

दीपके यांनी सांगतिले, ‘जयपूरमध्ये आंदोलनावेळी दगडफेक, मारहाण आणि गैरवर्तनाचा सामना करावा लागला, जंतरमंतर येथे सुमारे ४० दिवस ४५ अंश तापमानात आंदोलन करावे लागले, अशा परिस्थितीत संघर्ष करणे आंदोलकांची हौस नसून, मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी स्वीकारलेला मार्ग आहे. सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेतल्यास ‘सीजेपी’ पहिल्या दिवसापासून संवादासाठी तयार आहे,’ असेही दीपके यांनी स्पष्ट केले. आंदोलन सुरू झाल्यानंतर चर्चेसाठी बोलावण्यास सरकारला ३० दिवस का लागले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. लोकशाहीमध्ये संघर्षाऐवजी संवादाला प्राधान्य मिळायला हवे, आंदोलकांना अडविण्यापेक्षा त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. ‘सीजेपी’ला कधी आम आदमी पक्षाशी, कधी काँग्रेसशी, तर कधी डाव्या पक्षांशी जोडले जात असल्याच्या आरोपांवरही चर्चा झाली. विविध राजकीय विचारांचे लोक आंदोलनात सहभागी होत असले, तरी त्यामुळे संपूर्ण चळवळ कोणत्याही एका पक्षाची ठरत नाही, अशी भूमिका मांडण्यात आली. शिक्षणातील सुधारणा, विद्यार्थ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, नागरिकांचे अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता या मुद्द्यांवर स्वतंत्रपणे आवाज उठविण्याचा सीजेपीचा प्रयत्न असल्याचे या वेळी सांगण्यात आले, या वेळी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या उत्तरदायित्वाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com