विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या अटकेविेरोधात डाव्या संघटना आक्रमक; डाव्या पक्षांच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई पोलीस सहआयुक्तांची भेट

विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या अटकेविेरोधात डाव्या संघटना आक्रमक;  डाव्या पक्षांच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई पोलीस सहआयुक्तांची भेट
Published on: 

विद्यार्थ्यांच्या अटकेविरुद्ध
डाव्या संघटना आक्रमक
शिष्टमंडळाने घेतली मुंबई पोलिस सहआयुक्तांची भेट
मुंबई, ता. १० : दिल्लीतील आंदोलनाचा धसका घेतलेल्या मुंबई पोलिसांनी आता थेट डाव्या आणि लोकशाहीवादी विचारांच्या विद्यार्थ्यांवर दडपशाही सुरू केली आहे. आंदोलनात सहभागी होऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींच्याही घरात घुसून त्यांच्या पालकांना धमकावण्याचा संतापजनक प्रकार पोलिसांकडून सुरू आहे, असा आराेप डाव्‍या पक्षांकडून केला जात आहे. पोलिसांच्या या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात आता डाव्या पक्षांच्या शिष्‍टमंडळाने मुंबईचे पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोज शर्मा यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले.

दिल्ली येथील सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांची मनमानी वाढली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. अनेकांना पोलिस ठाण्यात बोलावून बेकायदा ताब्यात घेतले जात असून, काहींना कुठे नेले आहे याची साधी माहितीही दिली जात नाही. पोलिसांच्या या दडपशाहीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, हा संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर थेट घाला असल्याचा आरोप डाव्या पक्षांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केला आहे.

एकीकडे सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या परिवारातील संघटनांना कार्यक्रमांसाठी पायघड्या घातल्या जातात, त्यांना सरसकट परवानग्या दिल्या जातात; मात्र डाव्या व लोकशाहीवादी संघटनांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांचा हत्यार म्हणून वापर का केला जात आहे, असा संतप्त सवाल शिष्टमंडळाने उपस्थित केला. सर्वांना समान न्याय लावत विद्यार्थ्यांचा छळ थांबवावा, असा इशाराही त्यांनी दिला.

विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर विनाकारण होणारी सरसकट कारवाई तत्काळ थांबवावी. तसेच सर्व पोलिस ठाण्याच्या या दडपशाहीला आळा घालण्यासाठी तातडीने कडक सूचना द्याव्यात, अशी मागणी डाव्या पक्षांचे नेते शैलेंद्र कांबळे यांनी केली आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com