घरात घुसून मुलाला मारहाण

घरात घुसून मुलाला मारहाण
Published on: 

अंबरनाथ, ता. ११ (वार्ताहर) : पश्चिमेकडील बुवापाडा परिसरात पूर्ववैमनस्यातून १६ वर्षीय मुलाला घरात घुसून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. झोपलेल्या मुलाला उठवून मारहाण करण्यात आली. तसेच लाकडी दांडक्याने पाठीवर आघात करून त्याला जबरदस्तीने ओढून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुवापाड्यातील पूजा किराणा स्टोअर्सजवळ ही घटना घडली. संघटन चौक परिसरातील राजन अनिल शर्मा हा मुलगा रहिवासी असून, तो त्याचा मित्र लाला याच्या घरी झोपला होता. लालाचे आई-वडील गावी गेल्याने राजन त्याच्या घरी थांबला होता. याचदरम्यान जुन्या भांडणाचा राग मनात धरून मयूरेश चव्हाण, विजय राजभर, सचिन परचा, रोहित चव्हाण, सूरज राजभर, सूरज राम, गणेश यादव, सागर राजभर, राज सिंग आणि अन्य एक अशा १० जणांनी घरात प्रवेश केला. त्यांनी झोपलेल्या राजनला उठवून मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी एका आरोपींनी लाकडी दांडक्याने त्याच्या पाठीवर आघात केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मारहाणीनंतर आरोपींनी राजनला धमकावत जबरदस्तीने सोबत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींच्या तावडीतून स्वतःची सुटका करून राजनने तेथून पळ काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com