अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या
Published on: 

अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या
तुर्भे हादरले! आरोपी अटकेत

नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) ः खाऊचे आमिष दाखवून एका नऊ वर्षांच्या अल्पवयीन चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी गळा आवळून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार तुर्भे परिसरात उघडकीस आला आहे. पावणे एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिर परिसरातील टेकडीवर या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. सीसीटीव्ही फुटेजच्या अत्यंत बारकाईने केलेल्या तपासाच्या आधारे तुर्भे पोलिसांनी एका ३० वर्षीय नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबई परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत मुलगी १० ऑक्टोबरला दुपारी आपल्या घराजवळ खेळत असताना अचानक गायब झाली. मुलीचा शोध घेऊनही ती न सापडल्याने हवालदिल झालेल्या कुटुंबीयांनी तत्काळ तुर्भे पोलिस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तातडीने तपासाची चक्रे फिरवली. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पिंजून काढले. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक महत्त्वपूर्ण पुरावा लागला. परिसरातच राहणारा आणि मुलीच्या परिचयाचा असलेला ३० वर्षीय आरोपी चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून सोबत घेऊन जाताना एका फुटेजमध्ये दिसून आला. त्यानंतर आरोपी तिला रिक्षात बसवून घेऊन गेल्याचेही सीसीटीव्ही विश्लेषणातून स्पष्ट झाले. संशयाची सुई फिरताच तुर्भे पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीने चिमुरडीला पावणे एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिराजवळील निर्जन जंगलात टेकडीवर नेले. तेथे तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिने कोणाला सांगू नये म्हणून गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली. आरोपीने दाखवलेल्या जागेवर जाऊन पोलिसांनी शोध घेतला असता, चिमुरडीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.
...
विशेष तपास पथक स्थापन
तुर्भे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्या विरोधात अत्याचार आणि हत्येचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या खटल्याचा वेगाने आणि सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com