रोहा पालिका शाळांत रोबोटिक्स लॅब

रोहा पालिका शाळांत रोबोटिक्स लॅब
Published on: 

रोहा पालिका शाळांत रोबोटिक्स लॅब
डिजिटल शिक्षणानंतर प्रात्यक्षिक ज्ञानावर भर; यंदाच सुविधा सुरू करण्याचे नियोजन
रोहा, ता. १४ (बातमीदार) : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुस्तकी शिक्षणासोबत क्रीडा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध कौशल्यांच्या विकासावर भर देणे आवश्यक आहे. याच उद्देशाने रोहा नगर परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगर परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल बोर्ड उपलब्ध करून दिल्यानंतर आता विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे, यासाठी रोबोटिक्स लॅब सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. यंदाच ही सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी दिली.
खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून तसेच मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांतून नगर परिषदेच्या सर्व शाळांमध्ये डिजिटल बोर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सुविधेचा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगला उपयोग होत आहे. आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक सुविधांचा विस्तार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे नगराध्यक्षा शेडगे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, ज्येष्ठ नेते मोहम्मद डबीर, शिक्षण सभापती रवींद्र चाळके, गटनेते महेंद्र गुजर, मुख्याध्यापिका मैमुना जळगावकर, नगरसेविका अल्मास मुमेरे, नगरसेवक अरबाज मणेर, अजित मोरे, माज सवाल आणि रोहा अंजुमन स्कूलचे चेअरमन अ. कादीर रोगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (ता. १३) पीएमश्री नगर परिषद रोहा उर्दू शाळा क्रमांक ४ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गटनेते महेंद्र गुजर यांच्या सौजन्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com