साहिल वाकोडे यांच्या कुटुंबियांना आयआयटीकडे जाण्यापासून रोखले

साहिल वाकोडे यांच्या कुटुंबियांना आयआयटीकडे जाण्यापासून रोखले
Published on: 

आयआयटीकडे जाण्यापासून वाकोडे कुटुंबीयांना रोखले
आझाद मैदानात कोंडल्याचा आंदोलकांचा आरोप

मुंबई, ता. १४ : साहिल वाकोडे यांच्या वडिलांनी आपल्या मुलाला न्याय मिळावा, यासाठी आझाद मैदानातील मागील काही दिवसांच्या उपोषणानंतर आज ‘चलो आयआयटी मुंबई’ अशी हाक देताच त्यांना पोलिसांकडून आयआयटी मुंबईकडे जाण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला.
पवई येथील आयआयटी मुंबईच्या प्रवेशद्वारावर ‘चलो आयआयटी’ आंदोलन करण्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी धरपकड केल्याचा आरोप विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी केला आहे. तसेच आझाद मैदानाला डिटेन्शन सेंटर करून कार्यकर्त्यांना बाहेर येण्यास मज्जाव केलाचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. आझाद मैदान परिसर आणि आयआयटी मुंबईतील परिसरात पोलिसांकडून २५ ते ३० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर काही कार्यकर्त्यांना पवई पोलिस ठाण्यात नेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आयआयटीच्या प्रवेशद्वारावर आंदोलनासाठी आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची पोलिसांनी अडवणूक केल्याचा दावा विद्यार्थी संघटनांनी केला. सकाळच्या सत्रात आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्यांना बाहेर जाण्यापासून रोखले जात असल्याने सरकारने मैदानालाच डिटेन्शन सेंटर बनवल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
...
आज दिवसभरात
- एका शिष्टमंडळाने आयआयटीच्या प्रवेशद्वार क्रमांक दोनमधून परिसरात प्रवेश केला. त्यात सुनील निरभवणे, कॉम्रेड तेजस, लोकशाहीर संभाजी भगत आणि नितीन मोरे यांच्यासह अन्य एकाचा समावेश होता, अशी माहिती दिली.
- ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (आयसा) कोमल, निशिगंधा आणि कौशिक मौर्य यांनीही आयआयटी परिसरात उपस्थिती लावली.
- ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या (एआयएसएफ) मुंबई शाखेनेही पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. भूपेश गुप्ता भवनबाहेर पोलिसांनी दिवसभर पहारा ठेवून विद्यार्थ्यांना कार्यालयात प्रवेश करण्यापासून रोखले आणि कारवाईची धमकी दिली, असा आरोप संघटनेकडून करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com