भिवंडीत हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना

भिवंडीत हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना
Published on: 

भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) : तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हत्येच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. एका घटनेत चारित्र्याच्या संशयातून लाकडी बांबूने डोक्यावर प्रहार करून हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत अज्ञात कारणावरून एका व्यक्तीचा जीव घेण्यात आला. यापैकी एका प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, दुसऱ्या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू आहे.
पहिली घटना अंजूर गावातील महावीर कॉम्प्लेक्सजवळ घडली. १४ ते १५ ऑक्टोबरदरम्यान सूरज शर्मा (४८, रा. मानकोली) यांची अवजड शस्त्राने हत्या करण्यात आली. शर्मा हे मिस्त्रीकाम करत होते. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपीने पलायन केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दुसरी घटना १५ ऑक्टोबरला खोणीगाव येथील आसरा हॉटेलजवळील पवार कम्पाउंड परिसरात घडली. येथील यंत्रमाग कारखान्याशेजारी लक्ष्मण चरपोट यांची चारित्र्याच्या संशयावरून लाकडी बांबूने डोक्यावर प्रहार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी निजामपूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, राजेशकुमार पटेल (४८, रा. मीठपाडा) याला पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. अंजूर येथील हत्येतील आरोपीचा शोध घेण्यासह या प्रकरणाचा पुढील तपास नारपोली पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com