

जव्हारमधील अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
आश्रमशाळेतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; तीन विद्यार्थी गंभीर
जव्हार, ता. १९ (बातमीदार) ः जव्हार तालुक्यातील हिरडपाडा येथील गगनगिरी अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या दुचाकीला रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आश्रमशाळेतील पाच विद्यार्थी रविवारी (ता. १८) रात्री गरबा खेळण्यासाठी सारसून येथील गावात गेले होते. यासाठी त्यांनी एका दुकानदाराकडे दवाखान्यात जातो, असे सांगत दुचाकी घेतली. नंतर एकाच दुचाकीवरून पाच विद्यार्थी गरबा खेळण्यासाठी गेले. रात्री आश्रमशाळेकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमींना जव्हार येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
आश्रमशाळेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
आश्रमशाळेत मुख्याध्यापक, वसतिगृह अधीक्षक आणि पहारेकरी असताना विद्यार्थी रात्रीच्या वेळी बाहेर कसे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
-----------------------------------
मुख्याध्यापक, अधीक्षक आणि पहारेकरी असतानाही विद्यार्थी रात्री बाहेर कसे गेले, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतील त्रुटी शोधून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी.
- सीता घाटाळ, अध्यक्ष, श्रमजीवी संघटना
-----------------------------------------
गगनगिरी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत संस्थेला चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे.
- पी. के. सिद्धार्थ रामकुमार
प्रकल्प अधिकारी, आत्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.