पूर्णेकर हत्याप्रकरणी राजेंद्र शिंदे यांची चौथ्यांदा चौकशी

पूर्णेकर हत्याप्रकरणी राजेंद्र शिंदे यांची चौथ्यांदा चौकशी
Published on: 

राजेंद्र शिंदे यांची चौथ्यांदा चौकशी
टल्ली, पपलू यांच्यासोबत समोरासमोर सवाल-जवाब

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची सोमवारी (ता. १९) चौथ्यांदा चौकशी करण्यात आली. ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी सुरू असून, मुख्य आरोपी संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमितसिंग ऊर्फ पपलू यांच्यासोबतही राजेंद्र शिंदे यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली.
राजेंद्र शिंदे यांना सोमवारी (ता. १९) सकाळी ११च्या सुमारास चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात हजेरी लावली. गेल्या चार दिवसांत त्यांची सुमारे २९ तास चौकशी करण्यात आली. हत्या प्रकरणातील आरोपी आणि राजेंद्र शिंदे यांच्यातील कथित संबंधांसह तपासातील विविध मुद्द्यांवर पोलिसांकडून माहिती घेण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी टल्ली आणि पपलू यांचीही चौकशी सुरू आहे. तपासातील माहितीची पडताळणी करण्यासाठी आरोपींसोबत समोरासमोर सवाल-जवाब करण्यात आल्याचे सांगण्यात येते. राजेंद्र शिंदे यांना पुन्हा येत्या बुधवारी (ता. २१) चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com