टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण
Published on: 

टायगर श्रॉफ गोळीबार
----

तिघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : अभिनेता टायगर श्रॉफच्या मोटारीवरील गोळीबार प्रकरणातील तीन संशयितांना न्यायालयाने आज ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तीनही संशयितांना कोटा येथून ताब्यात घेतल्यावर त्यांना मंगळवारी मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर आज न्यायालयापुढे हजर करण्यात आले.
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अनिल पंडितच्या सांगण्यावरून हा गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोनीपत येथील रेहान ऊर्फ सुक्का, बिहारच्या बेगुसराई येथील रितिक कुमार ऊर्फ रोशन आणि हरियाणाचा फुलसिंह यांना कोटा येथून मुंबईत आणण्यात आले. या गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे शोधून काढायची आहेत. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल फोन नष्ट केले आहेत. या कटाच्या मुळापर्यंत जायचे आहे तसेच गुन्ह्याचा हेतू उलगडायचा आहे. आरोपींच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे जमवण्यासाठीही वेळ हवा असल्याने सर्व आरोपींना पोलिस कोठडी आवश्यक असल्याची बाजू पोलिसांनी न्यायालयात मांडली. या वेळी बचाव पक्षाचे वकील अजिंक्य मिरगल आणि सत्यव्रत जोशी यांनी पोलिस कोठडीला विरोध केला. शस्त्रे जप्त करण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी आवश्यक नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच आरोपींची ट्रान्झिट रिमांडदरम्यानच चौकशी करण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजू ऐकल्यावर न्यायालयाने तिघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com