

''एडलवाइज''च्या आयपीओसाठी
किंमतपट्टा निश्चित
मुंबई, ता. २१ : एडलवाइज अल्टरनेटीव्ह्ज ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने आपल्या आयपीओसाठी (प्राथमिक समभाग विक्री) १,५८५ ते १,६६५ रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला आहे. या आयपीओमध्ये २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान गुंतवणूक करता येणार आहे.
कंपनीने सौर ऊर्जा प्रकल्प, महामार्ग, कार्यालये आणि वीज वितरण वाहिन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यात १.७३ गिगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प, ४,५८६ लेन किलोमीटरचे रस्ते, ३१ लाख चौरस फुटांची कार्यालये आणि ८३५ सर्किट किलोमीटरच्या वीज वितरण वाहिन्यांचा समावेश आहे. कंपनीची अंतर्गत संस्था असलेल्या सिक्युराचे पथक या मालमत्तांचे दैनंदिन कामकाज सांभाळते.
एडलवाइज अल्टरनेटीव्ह्ज विविध प्रकारच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करते. कंपनीच्या एकूण मालमत्तांमध्ये व्यापारी प्रकल्पांचा वाटा ४२ टक्के आहे. याशिवाय कंपनीने पायाभूत सुविधांमध्येही गुंतवणूक केली आहे, अशी माहिती अमित अग्रवाल यांनी दिली.
कंपनीने देशातील अनेक महामार्गांमध्ये गुंतवणूक केली आहे. या महामार्गांमधून कंपनीला टोलच्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळते. तसेच काही प्रकल्पांमधून ठरावीक वार्षिक रक्कम मिळते.
कंपनीला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ९६३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर २६५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत कंपनीने ८० कोटी रुपयांचा नफा नोंदवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.