जि. प.शाळेच्या दोन वर्ग खोल्यांचे लोकार्पण

जि. प.शाळेच्या  दोन वर्ग खोल्यांचे लोकार्पण
Published on: 

कान्होळ शाळेत दोन वर्गखोल्यांचे लोकार्पण
रेशमा घरत यांच्या प्रयत्नांतून नवे रूप

मुरबाड, ता. २२ (वार्ताहर) : तालुक्यातील कान्होळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचे नुकतेच सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक बाळा घरत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शाळेसाठी स्वतंत्र जागा, संरक्षक भिंत, स्वच्छतागृह, स्वयंपाकघर आणि इमारतीची सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यापूर्वी शाळेचे वर्ग गावातील वेगवेगळ्या ठिकाणी भरत असल्याने सर्व वर्ग एकाच ठिकाणी आणण्याचे आव्हान होते. कान्होळ-बोरिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच रेशमा घरत यांनी यासाठी पुढाकार घेतला. सामाजिक कार्यकर्ते बाळा घरत यांनी शाळेच्या इमारतीसाठी पाच गुंठे जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर या जागेला संरक्षण भिंत बांधण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह, स्वयंपाकघर आणि शाळेची इमारत उभारण्यात आली. शाळेकडे जाण्यासाठी रस्त्याची अडचणही दूर करण्यात आली.

शाळेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या असल्या, तरी आणखी दोन वर्गखोल्यांची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन सरपंच रेशमा घरत यांनी आमदार किसन कथोरे यांच्या सहकार्याने आणखी दोन वर्गखोल्या मंजूर करून घेतल्या आहेत. त्यामुळे शाळेच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकार्पण सोहळ्याला ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. नव्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या वातावरणात शिक्षण घेता येणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com