

वृक्षछाटणीप्रकरणी खासगी कंपनीला नोटीस
परवानगीविना फांद्या कापल्याचा ठपका
तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : वाशी-तुर्भे लिंक मार्गावरील एपीएमसीच्या कांदा-बटाटा आणि फळ बाजार परिसरातील झाडांची विनापरवानगी छाटणी केल्याप्रकरणी नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाने एका खासगी होर्डिंग कंपनीला नोटीस बजावली आहे. गुलमोहर आणि पिंपळाच्या झाडांची छाटणी केल्याप्रकरणी लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
एपीएमसीच्या कांदा-बटाटा बाजार परिसरात वाशी-तुर्भे लिंक मार्गालगत असलेल्या तीन मोठ्या जाहिरात फलकांजवळ आठपेक्षा अधिक झाडांची रात्रीच्या वेळी छाटणी करण्यात आली. तसेच एपीएमसी सिग्नलजवळील फळ बाजारातील काही झाडांच्या फांद्याही कापण्यात आल्या. काही झाडांची चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात छाटणी केल्याने ती बोडकी झाली. या प्रकाराचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
याप्रकरणी बाजार समितीच्या माध्यमातून एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी पंचनामा केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांनीही या प्रकरणाकडे लक्ष वेधले. अखेर १२ ऑक्टोबर रोजी महापालिकेने संबंधित खासगी कंपनीला नोटीस बजावली.
खुलासा न दिल्यास कारवाई
वृक्ष प्राधिकरणाची पूर्वपरवानगी न घेता छाटणी केल्याप्रकरणी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संवर्धन व जतन अधिनियम, १९७५ मधील कलम २१ (१) व (२) अन्वये कारवाई का करू नये, असा सवाल नोटिशीत करण्यात आला आहे. निर्धारित मुदतीत लेखी खुलासा सादर न केल्यास संबंधितांना काहीही म्हणायचे नाही, असे गृहीत धरून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.