

शेअर मार्केटमधील प्रलोभनातून फसवणूक
नालासोपाऱ्यात पोलिसांचा छापा; १४ जणांवर गुन्हा
नालासोपारा, ता. २४ (बातमीदार) : शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत, ऑनलाइन पद्धतीने कॉल सेंटरच्या नावाखाली फसवणूक करीत असलेल्या टोळीचा नालासोपारा पोलिसांनी पर्दाफाश केला. नालासोपारा पश्चिमेतील छेडानगर परिसरातील एका सदनिकेवर पोलिसांनी छापा टाकून १४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नालासोपारा पश्चिमेतील छेडानगर येथील एका सदनिकेत काही व्यक्ती मोबाईलच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधून ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. तेव्हा खोलीमध्ये अनेक व्यक्ती मोबाईलवर बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या समोर मोबाईल क्रमांक व व्यक्तींची नावे असलेली यादी तसेच टेबलवर लॅपटॉप, प्रिंटर आणि इतर साहित्य आढळून आले. चौकशीदरम्यान या ठिकाणी बाहेरून मोबाईल क्रमांक मिळवून त्या क्रमांकांवर कंपनीतील कर्मचारी फोन करत असल्याची माहिती समोर आली.
शितल श्यामनारायण यादव (वय २७), दिनेश रामरूप यादव (३५), रोहित श्यामनारायण यादव (२६), अनुज सरोज पाल (१९), ओम कमलेश उपाध्याय (२१), कुशल जयकुमार गौड (१९), सुंदरम सुरेश उपाध्याय (२०), श्रीकांत नाननाथ कोरे (१९), अंश रामनगीना यादव (२७), चंदन गोपी राऊत (१९), स्वरूप राजेंद्र जायभव (२७), आनंद रामकिसुन मटेशिया (२५), रोहित मोहन राम (१९) अशी आरोपींची नावे असून, यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
‘सेबी रजिस्टर कंपनी’ असल्याची खोटी माहिती?
फोनवर संपर्क साधलेल्या नागरिकांना संबंधित कंपनी सेबी रजिस्टर असल्याची माहिती देऊन, त्यानंतर पैसे गुंतविण्याबाबत नागरिकांना प्रवृत्त केले जात असल्याचे चौकशीत समोर आले. तसेच कंपनीमार्फत नागरिकांना शेअर खरेदीसाठी फोन केल्यानंतर त्यांचे नूकसान झाल्यास संबंधित मोबाईल क्रमांक ब्लॉक लिस्टमध्ये टाकला जात असल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.