फ्रॅक्चरआधीच हाडांच्या आरोग्याची काळजी

फ्रॅक्चरआधीच हाडांच्या आरोग्याची काळजी
Published on: 

मुंबई, ता. २६ : हाडे ठिसूळ होण्याचा आजार अनेकदा फ्रॅक्चर होईपर्यंत लक्षात येत नाही. त्यामुळे वय वाढल्यानंतर हाडांची ताकद आणि ठिसूळपणाचा धोका वेळेत तपासण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यासाठी ऑस्टिओपोरोसिस सोसायटी ऑफ इंडिया आणि सन फार्माच्या वतीने ‘व्हाय वेट? टिल इट ब्रेक्स’ ही वर्षभराची जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेत ‘बोन हेल्थ स्कोअरकार्ड’च्या माध्यमातून नागरिकांमध्ये हाडांच्या आरोग्याचा धोका जाणून घेण्यावर भर दिला जाणार आहे. पुढील वर्षभरात एक लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून, विविध ठिकाणी हाडांची घनता तपासण्यासाठी शिबिरे घेण्यात येणार आहेत.

फ्रॅक्चरनंतर निदान होण्याचे प्रमाण अधिक
ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडांची घनता आणि मजबुती कमी होते. त्यामुळे किरकोळ पडणे किंवा धक्का लागल्यानंतरही फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. हा आजार सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणे देत नसल्याने अनेकांचे निदान फ्रॅक्चर झाल्यानंतरच होते. वयाच्या ५० वर्षांनंतर हा धोका वाढतो. विशेषतः रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये हाडांची झीज वेगाने होण्याची शक्यता असते.

ऑस्टिओपोरोसिसचे निदान होण्यापूर्वीच हाडांच्या आरोग्याचा धोका ओळखणे महत्त्वाचे आहे. हाडांची ताकद, वय, पूर्वीची फ्रॅक्चरची पार्श्वभूमी आणि अन्य जोखमीचे घटक लक्षात घेऊन वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
- डॉ. सुश्रुत बाभूळकर, अध्यक्ष, ऑस्टिओपोरोसिस सोसायटी ऑफ इंडिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com