नवी मुंबई विमानतळाहून एअर इंडियाच्या पश्चिम आशियायी सेवा

नवी मुंबई विमानतळाहून एअर इंडियाच्या पश्चिम आशियायी सेवा
Published on: 

पश्चिम आशियातील सेवा
नवी मुंबईत हलवणार
मुंबई विमानतळाच्या पुनर्विकासासाठी एअर इंडियाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २५ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १च्या पुनर्विकासासाठी एअर इंडिया ग्रुपने आपल्या काही विमानसेवा टप्प्याटप्प्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पश्चिम आशियातील प्रमुख शहरांसाठीच्या सेवांचा समावेश असून, ही प्रक्रिया २०२७च्या उन्हाळी विमान वाहतूक हंगामापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेस या योजनेंतर्गत डिसेंबर २०२६ पासून नवी मुंबई विमानतळावरून दररोज चार देशांतर्गत उड्डाणे सुरू करणार आहे. त्यानंतर जानेवारी २०२७ पासून ओमानसाठीच्या विद्यमान सेवांसह कुवेतसाठी नियोजित विमानसेवाही सुरू करण्यात येणार आहे.
याशिवाय, एअर इंडिया एक्सप्रेसची जेद्दाह, रियाध, दम्माम, दोहा, मस्कत आणि शारजा या शहरांसाठीची उड्डाणेही टप्प्याटप्प्याने नवी मुंबई विमानतळावर हलवण्यात येणार आहेत. आयएटीएच्या नॉर्दर्न समर २०२७ हंगामापर्यंत हे स्थलांतर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
----------------
संयुक्त कार्यप्रणालीला चालना
विमानतळ प्रशासनासोबतच्या समन्वयातून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १च्या पुनर्विकासाला मदत होण्यासोबतच मुंबई महानगर क्षेत्रातील दोन्ही विमानतळांच्या संयुक्त कार्यप्रणालीला चालना मिळणार आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विद्यमान स्लॉट कायम ठेवून प्रवाशांना कार्यक्षम सेवा देणे एअर इंडिया ग्रुपला शक्य होणार आहे.
दोन्ही विमानतळांवरून विमानसेवा सुरू राहिल्याने मुंबई महानगर क्षेत्रातील हवाई संपर्क अधिक मजबूत होईल आणि प्रवाशांना प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. आधुनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून प्रवाशांना उत्तम अनुभव देण्याची तयारी सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com